दुदैवी घटना : बहिणीच्या लग्नात भावाचा हृदयविकाराने मृत्यू; लग्नघरात शोककळा !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डोंगर कठोरा येथे मोठ्या बहीण्याच्या लग्नासाठी आलेल्या सेवेकरी भाऊने लग्ना आधीच घेतला जगाचा आपल्या लाडक्या बहीणीच्या लग्नासाठी गुजरातहुन आलेल्या दिवशी सेवेकरी भावाने बहीण बोहल्यावर चढण्या आदी घेतला जगाचा निरोप अगदी साद्या पद्धतीने लावण्यातआले बहीणीचे लग्न, मनाला हेलावणारी ही दुखद घटना यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावात घडली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की लिलाधर सरोदे राहणार डोंगर कठोरा यांची कन्या नमिता सरोदे हिचा विवाह दिनांक १७ नोव्हेंबर रोजी होण्याचे आयोजीत करण्यात आले होते . लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सहभागी होण्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी दिनांक १६ नोव्हेंबर रोजी वर मंडळींनी सवाद्य नाचगाण्याचा आनंद लुटला, दरम्यान दिनांक १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नववधु नमिता सरोदे हिचा लहान भाऊ स्वामीनारायण मंदीरात सेवकरी म्हणुन राहणाऱ्या राकेश सरोदे हा आपल्या लाडक्या बहीणीच्या लग्ना निमित्ताने वडताल गुजरातहुन आलेला होता तो डोंगर कठोरा गावातील स्वामीनारायण मंदीरात झोपलेला असतांना ह्दयविकाराचा तिव्र झटका आल्याने त्याचा झोपेतच मृत्यु झाला.

दरम्यान बहीणीच्या लग्नासाठी आलेल्या सेवेकरी भावाचा दुदैवी मृत्यु झाल्याने लग्नाचा आनंद सोहळ्यात दुखाचे वातावरण पसरले,अखेर मरण पावलेल्या सेवेकरी लहान भाऊ राकेश सरोदे याचा मृतदेह हा अंत्यसंस्कारासाठी वडताल ( गुजरात ) पाठविण्यात आला व अशा दुखमय प्रसंगात अगदी साद्या पद्धीतीने नमिता लिलाधर सरोदे हिचा विवाह दहिगांव तालुका यावल येथील राहुल लिलाधर पाटील यांच्या सोबत लावण्यात आला .

Protected Content