Home Cities अमळनेर भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू


अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी कार्यालयासमोरील रोडवर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित शिंगा पावरा रा. मांडळ ता. अमळनेर असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमित पावरा हा मुलगा आपल्या कुटुंबासह अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे वास्तव्याला होता. अमित याला पिंगळवाडे येथील आश्रम शाळेत दाखल करण्यासाठी त्याचे वडील शिंगा पांडू पावरा यांच्यासोबत सोमवारी २४ जून रोजी दुपारी साडेचार वाजता अमित हा दुचाकीने जाण्यासाठी निघाले. अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी कार्यालयासमोरील रोडवून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बापलेक दोघे जखमी झाले. त्यांना अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता अमित याला वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात आक्रोश केला होता. याप्रकरणी रात्री ९ वाजता दुचाकीचालक अजय वानखेडे रा. आर्डी ता. अमळनेर याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound