धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरूणाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवार ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या नातेवाईकांनी ओळख पटविली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरविंद कुमार प्रेमनाथ सरदार (वय १९, रा. सुखानगर, ता. प्रतापगंज जि. सुपल, बिहार) असे मयत अरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, अरविंदकुमार प्रेमनाथ सरदार हा तरूण आपल्या आईवडील, एक भाऊ, चार बहिणीसोबत वास्तव्याला होता. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव येथील कंपनीत कामाला असलेला तरुण कामगार हा सुट्टी घेवून सहकाऱ्यांसाबेत नगरवरून बिहार येथे दरभंगा एक्सप्रेसने घरी जाण्यासाठी निघाला होता. रेल्वे प्रवास करत असतांना दुपारी ४ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील माहिजी रेल्वे स्टेशनच्या परिसरात खंबा क्रमांक ३८६/१० ते १२ दरम्यान तो अचानक रेल्वेतून खाली पडला. हे मात्र सोबतच्या कामगारांना लक्षात आले नाही. रेल्वेमध्ये गर्दी खूप असल्यामुळे ते भुसावळला उतरले. तेव्हा अरविंद कुमार दिसून आला नाही. त्यांनी खूप शोधाशोध केली. दुसरीकडे माहिजी रेल्वे स्टेशनजवळ स्टेशन मास्तरने रेल्वे पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी अरविंद कुमारचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला होता. त्यानंतर त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू केले होते. मयत अरविंद कुमार याच्याजवळ आढळून आलेल्या दोन मोबाईलमुळे त्याची ओळख पोलीस कर्मचारी संजय जंजाळकर यांनी पटवली. त्यानुसार अरविंद कुमार यांचे जिजाजी सुनील विद्यानंद सरदार (वय २४) यांनी त्याची ओळख पटवली. सदर घटनेबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content