भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नॉर्थ कॉलनी परिसरात राहणाऱ्या फुटबॉल कोच असलेल्या एका ३५ वर्षीय तरूणाला विद्यूत शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिध्दार्थ अनिल पवार वय ३५ रा. नार्थ कॉलनी भुसावळ असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील नार्थ कॉलनी परिसरात सिध्दार्थ पवार हा तरूण वास्तव्याला होता. बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सिध्दार्थ पवार हा फुटबॉल खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी मैदानावर गेला होता. यावेळी लाईट आल्याने सिध्दार्थ याने तेथील लाईटाचे बटन सुरू केले. यावेळी त्याला जबर शॉक बसल्याने त्यासत शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. यामुळे या भागात शोककळा पसरली. याप्रकरणी येथील शहर पोलिसात मृत सिध्दार्थ याचे काका दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीवरून रात्री ८ वाजता अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, अब्दुल रज्जाक अब्दुल गनी, विकार शेख यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद पुढील तपास करीत आहे.