मारुती सुझुकीतील ३ हजार कंत्राटी कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

1Maruti Suzuki India

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मंदीचे संकट सर्वच क्षेत्रांवर घोंगावत असताना मारुती सुझुकीतील ३ हजार कंत्राटी कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

 

कंपनीतील ३ हजार कंत्राटी कामगारांचे कंत्राट वाढवण्यात येणार नाही, असे कंपनीचे अध्यक्ष आर. सी भार्गव यांनी स्पष्ट केले. गेल्या काही महिन्यांपासून वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. ही बाब लक्षात घेऊन आम्हाला हा कटू निर्णय घ्यावा लागत आहे, असे भार्गव यांनी पुढे नमूद केले. कंपनीच्या भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भार्गव यांनी वाहन निर्मिती क्षेत्राची सद्यस्थिती सर्वांपुढे ठेवत या स्थितीशी सामना करण्यासाठी कंपनी कोणती पावले उचलत आहे, ते सांगितले. वाढलेल्या करामुळे कारची मागणी घटत चालली आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठीच कंत्राटी कामगारांचे कंत्राट न वाढवण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग आहे, असेही भार्गव यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी बेरोजगार होणार असल्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण पसरलेलं आहे.

Protected Content