चाळीसगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून ती गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळविले. संशयिताने तब्बल साडे सहा महिने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. या प्रकारातून ती मुलगी गर्भवती झाल्याचा गंभीर प्रकार २१ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीला आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील चांभार्डी बु. (मजरे) येथील रहिवासी असलेला भगवान उर्फ भगा कैलास सोनवणे, असे संशयित आरोपीचे नाव आहे.
दरम्यान, पिडीतेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवी कलम- ३७६ (२) (एन), ३६३, ३६६ (ए), पोस्को अंतर्गत ४, ६, ८, १२ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.