शासनाकडून गुलाबी रिक्षा योजनेतर्गंत महिलांना ‘इतक्या’ टक्क्यांची रक्कम मिळणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लाडकी बहिण योजनेनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी आणखी एक मोठी योजना जाहीर केली आहे. १७ शहरांमधील १० हजार महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत रिक्षा खरेदीची २० टक्के रक्कम ही सरकारकडून देण्यात येणार आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, आम्ही महिलांसाठी आणखी एक योजना आणली आहे.

गुलाबी रिक्षा असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतून 20 टक्के रक्कम महिलेने भरायचे. २० टक्के सरकार तर ७० टक्के बँक लोनमधून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकार जाहीर केलेल्या पिंक ई रिक्षा योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना ई रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल. यासाठी कमाल आर्थिक सहाय्य रु. 80,000/- प्रदान केले जातील. लाभार्थी महिला महाराष्ट्राच्या कायम रहिवासी असाव्यात. लाभार्थी महिलांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

Protected Content