मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश न मिळालेल्या महायुती सरकारने आता कळीचा मुद्दा पकडत, राज्यातील महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्याची नवी योजना आखली आहे. ज्यात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबवण्याच्या हालचाली सुरू आहेत. लोकसत्ता वृत्तसंथ्येने दिलेल्या माहितीनुसार, याअंतर्गत गरीब महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, यामुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक 12 ते 20 हजार कोटींचा आर्थिक भार पडणार आहे. त्यामुळे येत्या काळात समाजातील विविध घटकांसाठी नव्या आकर्षक योजना येण्याची शक्यता आहे. विशेषत: महिला आणि तरुणांच्या मतांसाठी काही दलचाली होतात का? हे पहावं लागेल.
या पथकाने योजनेचा अभ्यास केल्यानंतर त्याआधारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे समजते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याची घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकांपूर्वी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्री लाडली बहना ही योजना आणली होती. तेव्हा निवडणुकीत भाजपने राज्यात बहुमत मिळवले होते.
महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना महिन्याला 1200 ते 1500 रुपये मिळणार आहेत. दारिद्रय रेषेखालील 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला, विधवा, घटस्फोटितांना लाभ होणार आहे. रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे.