पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कमलसृष्टी बहुउद्देशीय संस्था व महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव (हरेश्वर) हरिहरेश्वर मंदिर येथे मध केंद्र योजनेअंतर्गत एकदिवसीय जनजागृती मेळावा नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते, अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी केले तसेच कार्यक्रमाला प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून खादी ग्रामोद्योग जळगावचे औद्योगिक पर्यवेक्षक व्ही. डी. पाटील, औद्योगिक पर्यवेक्षक रुपेश पाटील, मधु क्षेत्रिक खादी ग्रामोद्योग नाशिक के. व्ही. सुरवाडे, पाचोरा, गट संस्थेचे एस. पी. विसपुते, पाचोरा तालुका कृषी अधिकारी आर. एन. जाधव, यांचे मार्गदर्शन लाभले.
के. व्ही. सुरवाडे यांनी ‘मधमाशी पालन’वर मार्गदर्शन केले. “मधमाशी ही निसर्गासाठी खूप मोलाचे काम करणारा जीव आहे मधमाशी पासून पर परागीकरण झाल्याने शेतकऱ्याच्या पिकांना जसे मोसंबी, डाळिंब, शेवगा, इत्यादी अशा पिकांमध्ये उत्पन्नात वाढ होते. या सृष्टीवर जोपर्यंत मधमाशी परपरागीकरण करत आहे; तोपर्यंत ह्या निसर्गाचे सौंदर्य टिकून आहे त्यासाठी मधमाशी पालन केले पाहिजे. म्हणजे दोन उद्देश साध्य होतील व्यवसाय पण मिळेल व निसर्गाला जपता पण येईल.” असे त्यांनी सांगितले.
तालुका कृषी अधिकारी जाधव यांनी. “शेतकऱ्यांनी शेती व त्याला जोड व्यवसाय म्हणून मधमाशी पालन करावे. हे केल्यास शेतकऱ्याच्या शेतीचे उत्पादनात पण वाढेल व त्याला शेतीला पूरक असणारा जोड व्यवसाय पण मिळेल जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच त्यांचेवर कर्ज होणार नाही. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती केली पाहिजे.” असेही मार्गदर्शन केले.
“मधमाशी पालन व शेती विषयक योजना अंतर्गत त्यांना हे व्यवसाय करायचे असेल त्यांनी मला भेटा मी पूर्ण तुम्हाला मार्गदर्शन करेल.” असे कृषी अधिकारी जाधव यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या मार्गदर्शनातून सांगितले. प्रकाश पाटील यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. कमलसृष्टी बहुउद्देशीय संस्थाध्यक्ष मुकेश तुपे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील, ईश्वर पाटील, कमलसृष्टी बहुउद्देशीय संस्था सचिव सुनिल चिंचोले यांनी देखील नव व्यवसायिकांना व्यवसाय विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला गणेश पाटील, महेश पाटील, रविंद्र शर्मा, पिंपळगाव (हरेश्वर) येथील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थितांचे आभार महेश पाटील यांनी मानले.