यावल प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच उमेश सोनवणे यांनी निवडीनंतर मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अपात्र केले आहे.
सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील थोरगव्हाण ग्रामपंचायतीची सर्वत्रिक निवडणूक २७ जुलै २०१८ रोजी घेण्यात आली. या निवडणूकीत अनुसुचित जमाती प्रवर्गातून लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आले होते. ग्रामपंचायतचे उपसरपंच ज्योती केवल पाटील व पंडीत आंनदा पाटील यांनी १५ सप्टेंबर र०२० रोजी सरपंच उमेश सोनवणे यांचा विरोधात तक्रारी अर्ज दाखल केला होता. सरपंच उमेश देवराम सोनवणे यांना ८ वेळा सुणावणीच्या नोटीसा काढण्यात आल्या व अतिंम निकाल राखुन जिल्हाधिकारी जळगाव यांनी ८ नोव्हेंबर २१ रोजी जातवैधता प्रमाणपत्र विहित वेळेत सादर न केल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अपात्र घोषीत केली आहे. या कारवाईमुळे लोकनियुक्त सरपंचांना पायउतार व्हावे लागले.