जळगाव प्रतिनिधी । बेकायदेशील गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात पकडले असून त्याच्या विरोधात चोपडा ग्रामीण पोलीसात आर्म ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतापसिंग उनासिंग खीच्छी (वय-४८) रा.उमर्टी ता.वरला, जि.बडवाणी (मध्यप्रदेश) असे संशयिताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील उमर्टी गावात प्रतापसिंग उनासिंग खीच्छी हा त्याचे ताब्यात एक गावठी कटटा व राऊंड असुन तो चोपडयाकडे गावठी कटटा व राऊंड सह येणार असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, सहायक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, प्रविण हिवराळे, उमेशगिरी गोसावी, दिपक शिंदे, परेश महाजन, किरण धनगर अशांना उमर्टी गावाकडे रवाना केले.
गोपनिय माहितीनुसार, उमर्टी गावाजवळ सापळा संशयित आरोपी प्रतापसिंग उनासिंग खीच्छी याला अटक करून त्याच्या ताब्यातील गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्यांच्या विरोधात चोपडा ग्रामीण पोलीसात भाग-५ गुरन.१४/२०१९ हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.