जळगाव प्रतिनिधी । काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद जळगाव महामार्गावर एका कारचालकाला लुटून फरार झालेल्या टोळीतील आरोपी भुषण ऊर्फ जिगर रमेश बोंडारे (रा.उमाळा) याला आज जळगाव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबादेत अटक करून येथे आणले आहे.
काल रात्री ८ वाजता पोकॉ पंकज शिंदे, पोकों अविनाश देवरे, पोकॉ दिपक शिंदे हे स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात असताना पो.नि. किरणकुमार बकाले यांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर कळविले की. एमआयडीसी पो.स्टे.गुरनं. १०५०/२०२० भादंवि क ३९४, ३४ या गुन्हयांत निष्पन्न आरोपी भुषण बोंडारे हा गुन्हा केल्यापासुन गावातून निघून गेलेला होता. तो सध्या औरंगाबाद शहरात उस्मानपुरा भागात राहत आहे भुषणला आपण सर्व जण ओळखता या पथकाने औरंगाबादेत जावून आरोपीला शोधून त्यास ताब्यात घेण्याच्या कारवाईबाबत आदेश दिले.
हे पथक खाजगी वाहनाने औरंगाबाद शहरात उस्मानपुरा भागात गेले. तेथे पथकाने भुषण उस्मानपुरा भागात पायी चालतांना दिसला या पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आज सकाळी ९ वाजता त्यास ताब्यात घेतले.
६ महिन्यापुर्वी मी व उमाळ्याचाच अजय सुदाम भिल, औरंगाबादचे बंटी ऊर्फ प्रथमेश पाटील, पवन अग्रवाल व मनोज भांबर्डे (रा.वाळुज) यांनी एका कारमध्ये बसून उमाळाकडे येतांना पिस्तोल कारवाल्यास लावली होती त्यावेळी मनोज भांबर्डे याने त्याच्या डोळयात मिरची पावडर फेकून त्याचेजवळील रोख रुपये व मोबाईल हिसकावून आम्ही पळून गेलो होतो . चोरलेल्या पैशांचे सर्वांना वाटप केले होते.आमचे फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने मी बाहेर गावी निघून गेलो होतो. आता मी उस्मानपुरा औरंगाबाद येथे मित्राच्या खोलीत राहत आहे, अशी कबुली त्याने या पथकाला दिली आहे.