Home राजकीय उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीची तारीख ठरली

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीची तारीख ठरली

udhav
udhav


udhav
 

मुंबई (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकासआघाडीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. नुकतीच राज्याचे आगामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीची तारीख ठरली आहे.

 

येत्या एक डिसेंबरला शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होणार आहे. ठाकरे घराण्यातील या पदावर विराजमान होणारे उद्धव ठाकरे पहिले नेते ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने मिळून तयार केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय या तिन्ही पक्षांनी घेतला आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शपथविधी सोहळयासाठी महापालिकेला तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


Protected Content

Play sound