उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील त्यांना शुभेच्छा : रामदास आठवले

Ramdas Athavale and Uddhav thackray 678x381

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस ही अनैसर्गिक आघाडी आहे. ती किती दिवस टिकेल माहीत नाही. परंतू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील त्यांना शुभेच्छा. त्यांनी जनतेची कामे करावी, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

 

महायुतीचे सरकार यावे यासाठी मी प्रयत्न केले. शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही राहिली. मात्र भाजप ऐकत नाही हे पाहून त्यांना सत्तेबाहेर ठेवायचे हे शिवसेने ठरवले. जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे हे आधी समोर आले असते, तर भाजपने पाठिंबा दिला असता, असा गौप्यस्फोटही रामदास आठवले यांनी केला आहे. रामदास आठवले म्हणाले की, बाळासाहेबांचे नाव पुढे करुन शिवसेना राजकारण करत आहे. बाळासाहेबांचे शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न कधीच पूर्ण झाले आहे. काँग्रेसकडून शिवसेनाला पाठिंबा मिळणार नाही असे वाटले होते, पण आता त्यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळासाहेबांच्या तत्वाविरोधात आघाडी केली आहे. ही अनैसर्गिक आघाडी आहे. ती किती दिवस टिकेल माहीत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील त्यांना शुभेच्छा. त्यांनी जनतेची कामे करावी. तसेच आघाडीत मंत्रिपदावरुन वाद होतील, असा दावा देखील आठवलेंनी केला.

Protected Content