उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी देशभरातील मान्यवर मुंबईत दाखल

udhav

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधीसाठी देशभरातून मान्यवरांचे मुंबईत आगमन झाले आहे.

शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील सोहळ्यात थोड्याच वेळात शपथ घेणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डीएमकेचे एम. के. स्टॅलिन या शपथविधीसाठी मुंबईत दाखल आले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे कुटुंबातील आनंदाच्या क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना राज ठाकरे हजर राहतील. स्वतः उद्धव ठाकरे यांनी राज यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी फोन करुन निमंत्रण दिले होते.

Protected Content