मुंबई (वृत्तसंस्था) उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यासाठी संभाजी भिडे मातोश्रीवर आले होते. परंतू उद्धव ठाकरेंनी भेट नाकारल्यामुळे संभाजी भिडे यांना रिकाम्या हातीच परतावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्ता संघर्ष थांबवण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे गुरुवारी रात्री मातोश्रीवर पोहोचले. पण संभाजी भिडे यांना उद्धव ठाकरेंची भेट घेता आली नाही. शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्ता स्थापनेसाठी मोठा राजकीय संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठीच संभाजी भिडे यांनी पुढाकार घेत मातोश्री गाठल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, तत्पूर्वी संभाजी भिडे मध्यस्थी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र उद्धव यांनी ही भेट नाकारली. यावर भाजप-शिवसेना चर्चेत मध्यस्थींची गरज नसल्याचे आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले.