नवी दिल्ली । कोविडच्या आपत्तीमध्ये चांगला कारभार करणार्या देशातील मुख्यमंत्र्यांमध्ये उध्दव ठाकरे हे सर्वोत्कृष्ठ ठरल्याचे निष्कर्ष एका ऑनलाईन सर्वेक्षणातून समोर आले आहेत.
ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून करोनाच्या कालावधीमध्ये सर्वात चांगल्या पद्धतीने काम करणारे देशातील मुख्यमंत्री कोण असा ट्विटर पोल घेतला होता. पहिल्या पोलमध्ये दोन लाख ६७ हजार २४८ जणांनी आपलं मत नोंदवलं. यापैकी ६२.५ टक्के मत ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळाली. म्हणजेच दोन लाख ६७ हजार २४८ जणांपैकी एक लाख ६७ हजार ३० मतं उद्धव यांना मिळाली. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ३१.६ टक्के तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ४.६ टक्के आणि केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना १.३ टक्के मत मिळाली. म्हणजेच योगी यांना एकूण ८४ हजार ४५० मतं मिळाली. केजरीवाल यांना १२ हजार २९३ तर विजयन यांना ३ हजार ४७४ मतं मिळाली.