Home राष्ट्रीय पूल पडल्याबद्दल उध्दव ठाकरे यांनी अवाक्षरही न काढल्याने मुंबईकर संतप्त

पूल पडल्याबद्दल उध्दव ठाकरे यांनी अवाक्षरही न काढल्याने मुंबईकर संतप्त


 

images 2

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना-भाजप युतीचा अमरावती येथे आज (दि.१५) जाहीर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर आले होते. विशेष म्हणजे या वेळी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी सीएसटी पूल दुर्घटनेसंदर्भात अवाक्षरही काढलं नाही. त्यामुळे मुंबईकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

सीएसटी पूल दुर्घटनेला एवढे तास उलटूनही उद्धव ठाकरे यांना घटनास्थळी फिरकले, ना जखमींची विचारपूस केली. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, ३० हून अधिक लोक जखमी झाले. मात्र मुंबईची महापालिका ताब्यात असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केलेलं नाही.
ही दुर्घटना शिवसेनेच्या हलगर्जीपणामुळेच घडल्याचं आता समोर आलं आहे. तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही या पुलाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. दुर्घटनास्थळ हे मातोश्रीपासून तासाभराच्या अंतरावर आहे. परंतु तिकडे न फिरकता उद्धव ठाकरेंनी थेट ४५० किलो मीटरचं अंतर कापत अमरावती गाठलं. अमरावतीच्या सभेतही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि युती सरकारचे गोडवे गायले. परंतु सीएसटी पूल दुर्घटनेसंदर्भात अवाक्षरही काढलं नाही. त्यामुळे मुंबईकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  v


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound