अमळनेर (प्रतिनिधी) भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर आज सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्या मूळ गावी डांगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
उदय वाघ यांना अमळनेर येथे राहत्या घरी गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र धक्का आला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील डांगरी या त्यांच्या मूळ गावी उदय वाघ यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अमळनेर तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.