जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील खासगी काम आटोपून घरी निघालेल्या तरूणांच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना आज मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता शिरसोली रोडवर घडली. दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
शुभम आबा घुगे (वय-२०) आणि धमेंद्र लहानू घुगे (वय-४०) दोन्ही रा. म्हसावद ता. जि.जळगाव असे जखमी झालेल्या तरूणांची नावे आहे. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, शुभम घुगे व धमेंद्र घुगे हे शेतीचे काम करतात. आज मंगळवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता ते दुचाकीने जळगावात त्यांच्या वाहनाच्या दुरूस्तीच्या कामाच्या निमित्ताने आले होते. वाहनाचे काम आटोपून ते घरी जाण्यासाठी दुपारी ४.३० निघाले. शिरसोली रोडवरील रायसोनी कॉलेजजवळील वळणाच्या रस्त्यावरून जात असतांना समोरून येणाऱ्या अनोळखी दुचाकीने त्यांच्या दुचाकीचा जोरदार धडक दिली. यात शुभम घुगे आणि धमेंद्र घुगे दोघे रोडच्या बाजूला दुचाकीवरून पडले. यात धमेंद्रचा पायाचा पंजा फ्रॅक्चर झाला असून शुभमला किरकोळ जखमा झाल्या आहे. दोघांना तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.