Home धर्म-समाज नाशिकला रामकुंडात पोहताना दोन तरुण बुडाले

नाशिकला रामकुंडात पोहताना दोन तरुण बुडाले

images 1
images 1

images 1

नाशिक (वृत्तसंस्था) येथील गोदाकाठावर रामकुंडात पोहायला गेलेले दोन तरुण बुडाल्याची घटना घडली. दोघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. लक्ष्मण मीना असे मृत पावलेल्या १८ वर्षीय तरुणाचे नाव आहे.

 

दोघेही तरुण राजस्थानाचे असून ते नाशिकमध्ये पर्यटनासाठी आले होते. लक्ष्मण मीना याच्या मृतदेहावर जखमा असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अहमदनगरसाठी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत काहीशी वाढ झाली होती. यामुळे कालपासून गोदावरी खळाळून वाहत होती. पर्यटनासाठी आलेले हे तरुण रामकुंड भागात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, ते नेमके कसे बुडाले ? याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound