जळगाव–लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सम्राट कॉलनी येथे जुन्या वादातून दोन जणांनी एकमेकांवर चाकूने वार केल्याची घटना रविवारी 27 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक आणि मित्र परिवार यांची मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
धीरज दत्ता हिवराळे (वय २७ रा. सम्राट कॉलनी जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर कल्पेश वसंत चौधरी (वय २५, रा. सम्राट कॉलनी) हा जखमी झाला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सम्राट कॉलनी येथे धीरज हिवराळे याचे आणि कल्पेश चौधरी यांच्यात जुना वाद होता. हा वाद पुन्हा रविवारी २७ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी धीरज आणि कल्पेश यांच्यामध्ये जुन्या वादातून शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये दोघेजण गंभीरित्या जखमी झाले. त्यांना तातडीने खाजगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयात दोन्ही तरुणांच्या नातेवाईकांची व मित्र परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर धीरज हिवराळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी मयत झालेल्या तरुणाच्या पालकांनी व मित्रपरिवार आणि एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड
यांच्यासह पथकाने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.



