Home क्राईम शिवीगाळ केल्याच्या गैरसमजूतीतून महिलेचा दोघांवर हल्ला

शिवीगाळ केल्याच्या गैरसमजूतीतून महिलेचा दोघांवर हल्ला


ladies marhan
 

भुसावळ (प्रतिनिधी) येथील जुना सातारा कोळी वाड्यात आपल्यालाच शिवीगाळ करत असल्याच्या गैरसमजूतीतून एका महिलेने विळ्याच्या साह्याने दोघांवर हल्ला चढवित जखमी केल्याची घटना काल (गुरुवार) दुपारी घडलीय. याप्रकरणी गुन्हा दाखल करत संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.

 

 

या संदर्भात जुना सातारा भागातील रहिवाशी कविता ऊर्फ पायल विशाल सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माम सासू रत्ना प्रकाश कोळी व बळीराम रघुनाथ कोळी यांच्यात घरगुती वाद सुरू होता. तो मिटविण्यासाठी कविता विशाल सूर्यवंशी ही दिनांक २ मे रोजी दुपारी १२:३० वाजेच्या दरम्यान गेली होती. यावेळी उज्वला किरण सपकाळे या महिलेला वाटले की, कविता ही मलाच अश्लील शिवीगाळ करीत आहे. दरम्यान, कविताने उज्वलाला सांगितले की, तुला शिवीगाळ करीत नसून हा आमचा घरगुती वाद आहे असे सांगितले. परंतु याचाच राग आल्याने उज्वलाने थांब तुझा मुडदाच पाडते, असे बोलून घरात जाऊन हातात विडा आणला आणि कविता आणि बळीराम कोळी यांना मारून जखमी केले. या संदर्भात पोलीस स्थानकात गु.र.न.९९/१९ भा.द.वि .कलम ३२४, ३०७,२९४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि एन.एस. सूर्यवंशी करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound