Home Cities अमळनेर एकाच दिवशी दोन विवाहितेंच्या आत्महत्या

एकाच दिवशी दोन विवाहितेंच्या आत्महत्या

0
83

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील दोन विवाहित तरुण महिलांनी एकाच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील मांडळ व अमळनेर शहरातील आर के नगर भागात घडली.

अमळनेर शहरातील आर. के. नगर भागातील भावना दीपक पाटील (वय ३२) या महिलेने १५ रोजी दुपारी साडेबारा वाजेपुर्वी स्वतःचं राहत्या घरी छताला बांधलेल्या झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत जितेंद्र साहेबराव पवार यांनी अमळनेर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहेत.
तर तालुक्यातील मांडळ येथील सोनाली राजू कांबळे वय २० या महिलेने दुपारी २ वाजेपुर्वी वरच्या मजल्यावर छताच्या कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सोनाली हीचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला असून तिचे पती डॉक्टर आहेत. या प्रकरणी पोलीस पाटील भास्कर चैत्राम पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रकाश चव्हाण करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound