हिंगोणा येथे दोन महिला पॉझिटिव्ह ; आरोग्य यंत्रणा सज्ज

यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणुच्या संसर्गजन्य आजाराने पुनश्च थैमान घालण्यास सुरूवात केली असून, कोरोना या घातक आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. काही यावल शहरातील भागांमध्ये सुद्धा दिवसागणित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता या महामारीने ग्रामीण भागात सुद्धा प्रवेश मिळवला असून आज तालुक्यातील हिंगोणा येथे दोन महिला पॉझीटीव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. 

यामुळे नागरीकांमध्ये आपल्या आरोग्याची काळजी म्हणुन चिंतेचे सावट वाढले आहे. कोरोनाच्या आगमनाने हिंगोणेकरांची ही चिंतेची बाब आहे. आज मिळुन आलेल्या बाधीतांमध्ये सापडलेल्या रुग्णांमध्ये एक ३० वर्षीय व ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाव्दारे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे हिंगोणा प्राथमिक केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज एम. तडवी यांनी केले असुन ग्रामस्थानी एकाच ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे.

तसेच अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर सुद्धा निघू नये. तसेच याबाबत ग्रामपंचायतीव्दारे नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ठोस अशी उपाय योजना करणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान आज यावल तालुक्यात १५ कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळुन आले असुन यात एका पोलीस अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे.

 

Protected Content