Home Cities अमळनेर जुन्या भांडणावरून दोन महिलांना बेदम मारहाण; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

जुन्या भांडणावरून दोन महिलांना बेदम मारहाण; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील कंजरवाडा भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेसह तिच्या चुलत सुनेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरूवार ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुनिता शंकर लांडगे वय ५५ रा. कंजरवाडा, अमळनेर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास महिला ही घरी तिच्या चुलत सुन रूपाबाई विक्की बाटुंगे यांच्यासोबत बोलत होते. यावेळी याच परिसरात राहणारे मीनाक्षी सुरज कंजर रा. कंजरवाडा अमळनेर हिच्यासह तिच्या नातेवाईकांनी काहीही न विचारता जुन्या भांडणाच्या कारणावरून सुनिता लांडगे या महिलेसह तिच्या चुलत सुनेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता सुनिता लांडगे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली, त्यानुसार मारहाण करणारे मीनाक्षी सुरज कंजर, नितीन साजन तमाईचे, सचिन साजन तमाईचे, तुषार सुरज गुमाणे, सुमनबाई नितीन तमाईचे, रोमा सचिन तमाईचे, नैना रोहित बाटुंगे, बेलाबाई कंजर, प्रिया गणेश बागडे, गब्बूबाई बागडे, नरेंद्र कोचरे आणि प्रितेश बागडे सर्व राहणार कंजरवाडा अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound