जळगाव (प्रतिनिधी) बांभोरीकडून जळगाव येत असलेल्या दोघा तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, इरफान शेख सांडू शेख (वय 26) आणि सोनू शेख सय्यद शेख (वय 18, दोघं रा. पिंप्राळा खाँजा मियानगर) हे दोघं पाळधी येथे धाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करून पिंप्राळा येथे परत येत असताना समोरून येणार्या अज्ञात छोटा हत्ती या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघं तरुण गंभीर जखमी झालेत. अपघात घडल्यानंतर परिसरातील तरुणांनी त्यांना तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. याबाबत अद्यापपर्यंत या अपघाताची कुठलीही नोंद पोलिसात नाहीय.