Home क्राईम दुचाकी चोरटा जेरबंद; चोरीची दुचाकी हस्तगत !

दुचाकी चोरटा जेरबंद; चोरीची दुचाकी हस्तगत !

0
122

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने डी मार्ट परिसरातून अटक केली आहे. मध्यप्रदेश राज्यातील रहिवासी असलेला विनेश चंपालाल बरडे (वय ३०) हा संशयित आरोपी सध्या कुसुंबा येथे राहत होता. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली आहे.

जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये ३१ ऑगस्ट रोजी मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस या चोरीचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाला गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली. मध्यप्रदेशातील विनेश बरडे नावाचा व्यक्ती सध्या चिंचोली, कुसुंबा गावाजवळ राहत असून, त्यानेच ही चोरी केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. माहितीनुसार, संशयित आरोपी डी-मार्टजवळ उभा होता.

माहिती मिळाल्यावर जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तात्काळ डी-मार्टजवळ पोहोचले. तिथे सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे संशयित इसम मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने त्याचे नाव विनेश चंपालाल बरडे (वय ३०) असून, तो मूळचा सेंधवा, जिल्हा बडवानी (मध्यप्रदेश) येथील असल्याचे सांगितले. तपास अधिकारी शरीफ रहीम शेख यांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत आरोपीची अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.


Protected Content

Play sound