Home क्राईम चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी


भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरातील बाळद रोडवर चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. या संदर्भात सोमवारी भडगाव पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दीपक निंबा पाटील रा. वडजी ता.भडगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ११ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दीपक पाटील हे दुचाकी (एमएच १९ एक्यू २४८३) ने जात असताना भडगाव शहरातील बाळद रोडवर चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १९ बीजे ३८२९)ने जोरदार धडक दिली. या अपघातात दीपक पाटील हा गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी दीपक यांचा भगवान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चारचाकीवरील चालक मगन बुधा वंजारी रा. पळासखेडा ता.भडगाव याच्यावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रदीप चौधरी करीत आहे.


Protected Content

Play sound