जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । साईनगरात घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, गिरीष नवल पाटील वय ३० हे साईनगर येथे वास्तव्यास आहेत. गिरीश पाटील यांनी सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांची एम.एच. १९ सी.एल ०२१४ या क्रमाकांची दुचाकी घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले असता, त्यांना दुचाकी आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने गिरीश पाटील यांनी मंगळवारी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल तायडे हे करीत आहेत.