ब्रेकींग न्यूज : दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात; महिला ठार, तीन जखमी

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव ते एरंडोल रस्त्यावरील अंबिका नगर जवळ दोन समोरासमोर दुचाकींची झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर लहान मुलगी आणि दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. यातील एकाची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, धरणगाव ते एरंडोल रस्त्यावरील अंबिका नगर येथे शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दोन दुचाकी समोरासमोर आल्याने त्यांचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पहिल्या दुचाकीवरील किरण पुंडलीक मराठे (वय-३५, रा. बोरखेडा बुद्रुक) तर दुसऱ्या दुचाकीवरील राकेश दुपसिंग बारेला (वय-४५), शानुबाई राकेश बारेला (वय-३५) आणि त्यांची कानबाई राकेश बारेली (वय-५, मुलगी रा.चाचपणी, दुधखेडा बलवाडी, मध्यप्रदेश) हे जखमी झाले होते. यातील गंभीर जखमी झालेल्या महिलेवर धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांना रूग्णवाहिकेने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान पोलिसातील सत्यवान पाटील, संजय सूर्यवंशी, चंदुलाल सोनवणे, उमेश पाटील, योगेश पाटील यांनी त्वरित जखमींना मदत कार्य करत खाजगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान यावेळी परिसरातील नागरिकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content