यावल ( प्रतिनीधी) तालुक्यातील चितोडा गावा जवळ यावल-फैजपूर रस्त्यावर पुन्हा दोन दुचाकीची वाहनांचा समोरा समोर धडक दिल्याने भिषण अपघात झाला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की आज दिनांक १७ ऑक्टोबर रोजी यावल कडून फैजपूर कडे जाणारे सुमर सिंग पांड्या बोरला (वय.३५. रा.पाल) हा दुचाकी क्रमांक एम .पी.१०.एन. सि . ४२१८. जात असतांना त्याच वेळेस फैजपूर कडून यावल कडे जाणारी दुचाकी क्रमांक एम. एच.१९. सिए २४६६ . गुलशेर नजीर तडवी वय (३०) रा. गिरडगाव .ता यावल हे आपल्या आई सलमाबाई नजीर तडवी हीला दुचाकी वाहनाने सोबत घेऊन यावल कडे जात असतांना चितोडा गावा जवळ त्यांच्या दुचाकी वाहनांचा समोरा समोर धडक दिल्याने भिषण अपघात झाला. या अपघातात तिन जण जखमी झाले असुन , जखमींना तात्काळ यावल येथील ग्रामीण रुगणालयालात दाखल केले असता यातील सुमर सिंग पांडया बारेला याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारा करीता जळगाव येथील जिल्हा शासकीय वैदयकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.