जळगाव प्रतिनिधी । कार्यालयातील काम संपवून घरी परतणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या दुचाकीला भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्याची घटना १० रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी जखमी मुरलीधर बंडू पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, एरंडोल पातरखेडा येथील रहिवासी मुरलीधर पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी पध्दतीवर लिपिक पदावर कार्यरत आहे. त्यामुळे ते (एमएच.१९.सीक्यू.५०२९) क्रमांकाच्या दुचाकीने पातरखेडा ते जळगाव अप-डाऊन करतात. मंगळवारी सायंकाळी ड्युटी संपवून मुरलीधर पाटील हे घरी जाण्यासाठी निघाले. महामार्गावरील हॉटेल आदर्शजवळून जात असताना त्यांच्या दुचाकीला (एमएच १९ डीएम ९४४२) क्रमाकांच्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या कमरेला दुखापत झाली. मात्र, धडक देवून दुचाकीस्वार तरून हा तेथून निघून गेला. अखेर उपचारानंतर शुक्रवारी मुरलीधर पाटील यांच्या फिर्यादीवरून (एमएच १९ डीएम ९४४२) क्रमाकांच्या दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदर्श हॉटेलजवळ दुचाकीचा अपघात; एकावर गुन्हा
4 years ago
No Comments