हॉटेलमधील गल्ल्यातून जबरी रोकड काढून दोघांना बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारातील तनिष्का हॉटेल येथे दोन जणांना शिवीगाळ करत मारहाण करून हॉटेलमधील गल्ल्यातून ६ हजार रूपयांची रोकड जबरीस्काहून हॉटेलमधील एलईडी टीव्ही, प्रिंटर व व्हिसीआर यांचे नुकसान केल्याची घटना बुधवारी ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे, याप्रकरणी गुरुवारी ८ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अंगद अभिमान सोलंकी वय-४१, रा. कुसुंबा ता.जि. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता कुसुंबा गावातील तनिष्क हॉटेलमध्ये अंगद सोलंखी आणि त्याचा मित्र भूषण मोहन सोनवणे बसलेले असताना त्या ठिकाणी राहुल ब-हाटे, सोपान राजपूत आणि विकी हिरे सर्व राहणार जळगाव हे तिथे आले. त्यांनी काहीही कारण नसताना अंगद सोळंकी आणि भूषण सोनवणे या दोघांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून काउंटर वरील गल्ल्यातून ६ हजारांची रोकड जबरी काढून हॉटेलमध्ये असलेल्या एलईडी टीव्ही, प्रिंटर आणि डीव्हीआरचे नुकसान केले आहे. दरम्यान या घटनेबाबत अंगद सोलंकी याने गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजता एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार राहुल बऱ्हाटे, सोपान राजपूत, विकी हिरे या तिघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.

Protected Content