Home क्राईम गणेश कॉलनीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; गुन्हा दाखल

गणेश कॉलनीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; गुन्हा दाखल

0
23

जळगाव प्रतिनिधी । गणेश कॉलनीतील अशोक बेकरीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली आणि एका दुचाकीचे नुकसान झाले. खराब झालेल्या दुचाकीच्या मालकाच्या तक्रारीवरून जिल्हा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निमखेडी परिसरात शिवधाम मंदिराजवळ  विनोद सोमनाथ नाईक वय ४९ हे वास्तव्यास आहे. त्यांची मेस असून त्यावर उदरनिर्वाह भागवितात. ३ सप्टेंबर रोजी विनोद नाईक हे त्याच्या इलेक्ट्रॉनिक दुचाकीने अशोक बेकरी परिसरातून जात होते. यादरम्यान समोरुन येणार्‍या एम.एच.१९. डी.सी. ८६६४ क्रमांकाच्या दुचाकीने  नाईक यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. ही घटना दुपारी १:३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. यात नाईक हे दुचाकीवरुन खाली पडल्याने त्यांना दुखापत झाली आहे. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळाहून पसार झाला. अपघातात नाईक यांच्या नुकत्याच नवीन घेतलेल्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी विनोद नाईक यंानी दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एम.एच.१९. डी.सी. ८६६४ क्रमांकाच्या दुचाकी चालका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुषार जावरे करीत आहे.

 


Protected Content

Play sound