जळगाव प्रतिनिधी । गणपती नगरातील सम्राट हौसींग अपार्टमेंट मध्ये मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी दोन दुचाकी जाळल्याचा प्रकार आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, हिमान्शू रविंद्र महाजन रा. सम्राट हौसिंग सोसायटी आपल्या परिवारासह राहतात. १ मे रोजी रात्री सर्वजण जेवण करून झोपेल. अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये त्यांची दुचाकी (एमएच १५ एफबी ७७०७) क्रमांकाची दुचाकी पार्कींगला लावली होती. त्याच्या बाजूला येथील वाचमन यांची देखील (एमएच १९ ९३२६) क्रमांकाची दुचाकी होती. मध्यरात्री २.४५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुचाकीवर काहीतरी केमीकल टाकून पेटवून दिल्यात. यात दोन्ही दुचाकी पुर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. सोबत अपार्टमेंटमध्ये असलेले इलेक्ट्रिक वायरर्स जळाले आहे. याप्रकरणी सुनिल पैहिलराज सुखवाणी (वय-४६) यांच्या फियादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलीस कर्मचारी करीत आहे.