जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ परिसरातील रिधुरवाडा येथून एकाची १५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल लांबविणाऱ्या दोन चोरट्यांना वाल्मिक नगरातून आज दुपारी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “दिवाकर हरीपद सांखी (वय-४१) रा. मातोश्री बिल्डींग रिधूरवाडा, शनीपेठ जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार, दि.२० जुलै रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांच्या मालकीची मोटारसायकल (एमएच १९ एएच ७०००) ही घरासमोर पार्किंग करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रूपयांची मोटारसायकल चोरून नेली होती.
याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करत असतांना मोटारसायकल चोरणारे चोरटे हे वाल्मिक नगरात असल्याची गोपनिय माहिती मिळाली.
त्यानुसार आज शनिवार, दि. २३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी महेश राजेंद्र तायडे (वय-२२) आणि दिपक लहानू कोळी (वय-२०) रा. वाल्मिक नगर, जळगाव यांना अटक केली आहे. दोघांनी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून चोरीची मोटारसायकल हस्तगत केली आहे.