जळगाव (प्रतिनिधी) नुकत्याच जाहीर झालेल्या MPSC च्या पोलीस उपनिरीक्षक ( Dept.PSI ) परीक्षेचा सुधारीत अंतिम निकाल जाहीर झाला असून त्यात दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचा विद्यार्थी प्रकाश मनोहर जाधव व गजानन आरेकर यांनी यश संपादन केले आहे. आपली पोलीस दलातील ड्युटी सांभाळून व मिळेल तेव्हा वेळ काढून अभ्यास करून त्यांनी आपले स्वप्न पुर्ण केले.
दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रात सुरू असलेले रेग्युलर बचेस, संडे बॅच , सेमिनार अश्या मार्गाने अभ्यासात सातत्य ठेवले तर कधी प्रा.वासुदेव पाटील यांच्याशी मोबाईल वरून काही अभ्यासाचे मुद्दे समजून घेतले. कोणताही बहाना न सांगता ध्येय कसे गाठता येते याचे हे उत्तम उदाहरण आहे. अशाच यशस्वी विद्यार्थ्यांमुळे स्पर्धा परीक्षेच्या विश्वात दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे नाव उंचावत आहे. राज्य शासन अंतर्गत व केंद्र शासना अंतर्गत सर्व स्तरावरच्या परीक्षेत दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे विद्यार्थी यशस्वी होत आहे. मागील सहा महिन्यात MPSC,रेल्वे, BANKING, ARMY, NAVY,SSC अशा अनेक क्षेत्रात सुमारे 30 विद्यार्थी यशस्वी झालेत. अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या या विद्यार्थ्यांना अधिकारी झालेले पाहून आम्हाला देखील अभिमान वाटतो. मेहनती विद्यार्थ्यांमागे दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र ठामपणे उभे असते. याप्रसंगी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.वासुदेव पाटील व दिशा टिमच्या सर्व सदस्यांनी यशस्वीतांना शुभेच्छा दिल्यात.