Home क्राईम जळगावात बसमध्ये चढताना चाकाखाली आल्याने दोन विद्यार्थी जखमी

जळगावात बसमध्ये चढताना चाकाखाली आल्याने दोन विद्यार्थी जखमी


bus accident

जळगाव प्रतिनिधी । येथील नवीन बस स्थानकात जामनेरच्या बसमध्ये चढतांना मागच्या चाकाखाली आल्याने दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना आज (दि.६) सायंकाळी ५.०० च्या सुमारास घडली. त्या दोघांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव-जामनेर ही बस सायंकाळी ४.४५ मिनिटांनी बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर लागत असताना सीट पकडण्याच्या नादात जमलेल्या गर्दीतून तीन जण मागच्या चाकाखाली पडले. दरम्यान त्यापैकी दोघांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. सागर संतोष झाल्टे (वय-१७, रा. पुरा गल्ली, जामनेर) आणि निखिल विजय पाटील (वय १७, रा. कुसुम्बा ता.जि. जळगाव) अशी जखमींची नावे आहेत.


Protected Content

Play sound