दोन भावंडांचे घरात चोरी; ९ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दोन भावंडांचा सामाईक असलेल्या घरातील हॉलचा दरवाजा आतून बंद करणे राहून गेला. ही संधी साधत चोरट्यांनी जगदिश प्रकाश सोनार (वय ३९, रा. जगन्नाथ नगर, जूना आसोदा रोड) यांच्यासह त्यांच्या भावाच्या घरात डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी २०० ग्रॅम सोन्याचे, ७५० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह १ लाख ३० हजारांची रोकड असा एकूण ९ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराती जूना आसोदा रोड परिसरातील जगन्नाथ नगरात जगदिश प्रकाश सोनार हे राहत असून त्यांचा सोने चांदीचे दागिने घडविण्याचा व्यावसाय आहे. जगदिश सोनार व त्यांचे मोठे भाऊ राजेंद्र सोनार यांचे सामाईक घर असून दोघांच्या घरात जाण्यासाठी एक सामाईक दरवाजा देखील आहे. रविवाार दि. १० रोजी रात्रीच्या सुमारास सोनार कुटुंबियांनी सोबत जेवण केले आणि त्यानंतर ते झोपून गेले. सोमवारी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास जगदिश सोनार यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी बेडरुममध्ये जावून पाहिले असता, त्यांना तेथील लाकडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला आणि त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. त्यांनी लागलीच जगदिश सोनार यांना उठवले दोघांनी कपाटाची पाहणी केल्यानंतर त्यांना कपाटात ठेवलेले १३६ ग्रॅम सोन्याचे, ४६० ग्रॅम चांदीचे दागिने दिसून आले नाही.
जगदिश सोनार यांना घरात चोरी झाल्याचे समजताच ते भावाला उभविण्यासाठी गेले. मात्र त्यांच्या किचनमध्ये असलेला सामाईक दरवाजा आतून कोणीतरी कडी लावून बंद केलेला होता. ते कडी उघडून त्यांच्या घरात गेले असात, त्यांच्या भावाच्या घरातील बेडरुममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा खालून वाकवून लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेले ६२ ग्रॅम सोन्याचे दागिने २९० ग्रॅम चांदीचे दागिने व १ लाख ३० हजारांची रोकड लांबवून नेली.
सोनार कुटुंबिय हे घराबाहेर आले आल्यानंतर त्यांना दोघ भावांच्या घराच्या कंपाऊंटचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच किचनच्या दोन्ही बाजूचे दरवाजांच्या चोरट्यांनी बाहेरुन कड्या लावलेल्या होत्या. त्यामुळे सोनार कुटुबियांना खात्री झाली की, राजेंद्र सोनार यांना त्याच्या घरातील हॉलचा दरवाजा आतून बंद करणे राहून गेल्याची संधी साधत चोरट्यांनी सोनार कुटुंबियांच्या घरात धाडसी घरफोडी केली.

Protected Content