Home क्राईम दोन रिक्षांची समोरासमोर धडक; एका तरुणीचा मृत्यू

दोन रिक्षांची समोरासमोर धडक; एका तरुणीचा मृत्यू


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर-अमोदा मार्गावर रविवारी एक ते दीड वाजेच्या सुमारास दोन ॲपे रिक्षांची समोरासमोर जोरदार धडक होऊन मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाला असून काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सीटर प्रवासी रिक्षा अमोदा येथून फैजपूरकडे येत होती, तर मालवाहू रिक्षा फैजपूरकडून अमोदा दिशेने जात होती. दोन्ही रिक्षांची समोरासमोर जोरदार धडक झाली. प्रवासी रिक्षा (क्रमांक MH 19 CW 3590) आणि मालवाहू रिक्षा (क्रमांक MH 19 7064) यामध्ये हा अपघात झाला.

या अपघातात सावदा येथील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. सोपान खडसे यांची कन्या अदिती सोपान खडसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त इतर प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना तातडीने फैजपूर पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे स्थानिक रुग्णालयात हलवले आहे. घटनास्थळी फैजपूर पोलीस दाखल झाले असून अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पुढील तपास फैजपूर पोलीस करीत आहेत.


Protected Content

Play sound