भडगाव प्रतिनिधी । मागील भांडणाच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कजगाव येथे घडली. दोन जणांवर भडगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, भावेश धमसिंग सोनवणे (वय-१९) रा. कजगाव ता. भडगाव हा शिक्षणासह मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता भावेश सोनवणे याला मागील भांडणाचे कारणावरून गावातील दुर्गेश भानुदास महाजन याने भावेशच्या दुचाकीला धडक दिली. तर दुर्गेश सोबत असलेले भानुदास हिलाल महाजन रा. कजगाव याने जातीवाचक शिवीगाळ करून दम दिला. भावेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी कैलास गावडे करीत आहे.