जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जिल्हा कारागृहाच्या मागील रस्त्यावरून घरी जात असतांना दुचाकी घसरल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना रविवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमीन राजू तडवी (वय ३२, रा. वाघ नगर) आणि अशोक शिंदे (वय ३४, रा. जिल्हा पेठ) दोघेजण रविवारी (२४ नोव्हेंबर) दुपारी २ वाजता दुचाकीने घरी जात असतांना जिल्हा कारागृहाच्या मागील रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांची दुचाकी अचानक घसरली या अपघताता अमीन तडवी व अशोक शिंदे हे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तडवी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.