फैजपूर (प्रतिनिधी) तत्कालीन जिल्हा अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांना ब्रेक लावले होते. त्यानुसार मागील ९ महिन्यापासून फैजपूर शहरातही अवैध धंदे बंद होते. परंतू मागील काही दिवसापासून शहरात पुन्हा दोन नंबरचे धंदे खुलेआम सुरु झाल्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
आज संपूर्ण जिल्ह्यासह फैजपूर शहरात अवैध धंदे बिनदिक्कत सुरु आहे. फैजपूरमधील दक्षिण बाहेर पेठ, बस स्टॅन्ड न्हावी दरवाजा, श्रीराम टॉकी यासह आजूबाजूचा परिसरात खुलेआम सट्टा, मटका सुरु आहे. फैजपूर, न्हावी,आमोदा,बामणोद परिसरात सट्टा पोलिसांच्या आशीर्वादाने खुलेआम सुरु असल्याचा आरोप होतोय. फैजपूर हे अतिशय शांतताप्रिय शहर आहे. मात्र, शहरात अवैध धंदे सुरु झाल्यापासून गुन्ह्यामध्ये वाढ झाली असल्याचे दिसून चित्र आहे. या अवैध धंद्यांवर स्थानिक पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करत नसल्यामुळे अवैध धंद्यावाल्यांनी पुन्हा एकदा चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री.उगले यांनी फैजपूर परिसरात सुरु असलेले अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.