श्रीलंकेत पाच तासांनंतर आणखी दोन स्फोट : मृतांचा आकडा 162 वर

art.sri

कोलंबो (वृत्तसंस्था) श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये आज ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. सकाळी सहा स्फोट झाल्यानंतर सुमारे पाच तासांनंतर आणखी दोन स्फोट झाल्याची माहिती कोलंबो पोलिसांनी दिली आहे. या नव्या स्फोटात आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत 162 जणांचा मृत्यू झाला असून, ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यात ३५ विदेशी पर्यटकांचा समावेशही आहे.

 

या साखळी स्फोटांनंतर भारतातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीलंका सरकारने देशात संचारबंदीचे आदेश दिले आहेत. कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Add Comment

Protected Content