चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विदर्भ दौ-यात आणखी दोन उमदेवारांच्या नावाची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरेंचा विदर्भ दौरा सुरू आहे.
चंद्रपूर येथील मनसे पदाधिका-यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये, चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.
राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांत आघाडी घेत मनसेचे ६ उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांनी एकला चलो रेची भूमिका घेतल्याचेही स्पष्ट होत आहे.