Home क्राईम वाईन शॉपमध्ये दोघांकडून तोडफोड; मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना मारहाण

वाईन शॉपमध्ये दोघांकडून तोडफोड; मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना मारहाण

0
318

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथील राज वाईन दुकानात दोन अनोळखी व्यक्तींनी मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की करत दुकानातील काचेचा दरवाजा फोडून मोठे नुकसान केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज वाईन दुकानाचे मॅनेजर राजेंद्र युवराज सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती दुकानासमोर आपसात भांडत होत्या. मॅनेजर राजेंद्र सोनवणे यांनी त्यांना ‘येथे वाद घालू नका,’ असे म्हणून शांत करण्याचा प्रयत्न केला. याच रागातून त्या दोन्ही व्यक्तींनी मॅनेजर राजेंद्र सोनवणे आणि इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या हल्ल्यामध्ये दुकानातील काचेचा दरवाजा तोडून मोठे नुकसान करण्यात आले.

या घटनेनंतर दुकानाचे मॅनेजर राजेंद्र सोनवणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी, १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.


Protected Content

Play sound