Home क्राईम अजिंठा चौकात दोन गटात झोंबाझोंबी; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

अजिंठा चौकात दोन गटात झोंबाझोंबी; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

0
174

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौकात दोन गटात बेशीस्तपणे वर्तन करून सार्वजनिक शांततेचा भंग करत झोंबाझोंबी केल्याचा प्रकार रविवारी २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील अजिंठा चौकात रविवारी २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास संकेत मराठे व त्याचा सोबत असलेला पप्पु मराठे आणि दुसऱ्या गटातील जावेद बासीद पिंजारी व आकीब शकील पिंजारी सर्व राहणार जळगाव यांच्यात काहीही कारण नसतांना बेशीस्त वर्तन करून सार्वजनिक ठिकाणी झोंबाझोंबी करून शांतता भंग केल्याचे दिसून आले. याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांवर कारवाई केली. यावेळी त्यांच्यामुळे या चौकात वाहतूकींचा खोळंबा झाला होता. पोलीसांच्या मदतीने ते सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील यांनी दिलेल्या‍ फिर्यादीवरून संशयित आरोपी संकेत मराठे, पप्पू मराठे, जावेद बासीद पिंजारी व आकीब शकील पिंजारी यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास चंद्रकांत पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound