किरकोळ वादातून दोन गटात तुफान हाणामारी; सात जणांवर गुन्हे दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील रस्त्यात लहान मुले खेळत असल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यात लोखंडी रॉड आणि विटाचा वापर करून एकमेकांना दुखापत केल्याची घटना सोमवारी ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली. याप्रकरणी रात्री १०.३० वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रस्त्यावर लहान मुलांच्या खेळण्यावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली. यात पहिल्या गटातील अबरार हमीद खाटीक वय १९ रा. उस्मानिया पार्क, जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून अरार खाटील व त्यांचा मित्र फारूख शेख उर्फ पादू, सलमान उर्फ चरबी, समीर शेख सलिम सर्व रा. पिंप्राळा यांना लक्ष्मी थोरात, दिलीप थोरात, कन्हैय्या अहिर सर्व रा.पिंप्राळा हुडको यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर यातील लक्षमी थोरात हिने हाता विट उचलून अबरार खाटीक यांच्या डोक्यात टाकून दुखापत केली.

तर दुसऱ्या गटातील दिलीप फकीरा थोरात वय ३२ रा. पिंप्राळा हुडको यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पिंप्राळा हुडको रोडवर लहान मुले खेळत असल्याच्या रागातून वाद होवून अबरार हमी खाटीक उर्फ चिरक्या, फारूख शेख उर्फ पादू, सलमान उर्फ चरबी, समीर शेख सलिम सर्व रा. पिंप्राळा यांनी दिलीप थोरात व त्यांचे शालक कन्हैय्या अहिर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तर यातील अबरार याने हातात लोखंडी रॉड घेवून कन्हैय्या याच्या डोक्यात टाकल्याने गंभीर दुखापत केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील एकुण ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content