Home क्राईम घोडगाव येथे दोन गटात हाणामारी ; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

घोडगाव येथे दोन गटात हाणामारी ; परस्पर विरोधी गुन्हे दाखल


MARAMARI
 

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील घोडगाव येथे किरकोळ वादातून दोन गटात शुक्रवारी चांगलीच हाणामारी झाली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

 

पहिल्या फिर्यादीत घोडगाव येथील पिडीत महिलेने म्हटले आहे की, दि 3 शुक्रवार रोजी 9:30 वाजता त्या अंगणात कपडे धूत होत्या. त्याचवेळी समोरील दोघं महिलांनी यांनी माझ्या आईला काहीही कारण नसताना मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी मी भांडण सोडवण्यासाठी गेली असता महेंद्र किसन कोळी याने मला अश्लील शिवीगाळ करून अंगावरील कपड्यात हात घातला. तसेच ओढले तसेच मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तर इतर सर्व आरोपींनी चापटा बुक्क्यांचा मार देऊन ओढताण केली. या प्रकरणी महेंद्र किसन कोळी, राजेंद्र भीमा कोळी ,महेंद्र कोळी व तीन महिलांवर (सर्व रा.घोडगाव) यांच्या विरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गु र न 35 भादवि कलम 143,147,354अ,294,323,427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

दुसऱ्या फिर्यादीमध्ये दुसऱ्या पिडीत महिलेने म्हटलेय की, दि 3 शुक्रवारी रोजी ती एका अन्य महिलेसोबत या घरासमोर गप्पा गोष्टी करत उभ्या होत्या. तिथे माजी जि प सदस्याचे पती अमृत देवचंद कोळी हे आले. आणि आमच्याबद्दल बद्दल बोलत आहेत का ? असा असा संशय घेऊन मला मागून मिठी मारली. तरसोबत असलेल्या दुसऱ्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच इतर दोन महिलांनी अश्लील शिवीगाळ केली. अमृत कोळी यांची मुलगी चार वर्षापासून माहेरी आहे. याचा राग आरोपींनी माझ्यावर काढला. या हाणामारीत गळ्यातील पोत खाली पडून नुकसान झाले,असे देखील पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी भाग 5 गु र न 36 भा द वि कलम 354अ,294,323,427 प्रमाणे अमृत कोळी व दोन महिलांविरोधात विरोधात चोपडा ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बी. बी. नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. नामदेव महाजन व जनार्धन चौधरी हे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound